।। श्रीदत्त प्रसन्न ।।
"वेदांताचे मूळ प्रयोजन दुःख दूर करणे हे नसून शोक दूर करणे हे आहे..."
🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶
थोडक्यात ह्या विषयी सांगायचं झालं तर एव्हढंच सांगेन की आपल्या मना विरुद्ध जर एखादी घटना घडली की जे होतं त्याला "दुःख" म्हणतात..."न होता मना सारिखे दुःख मोठे..."असे समर्थ वाचन सुप्रसिद्ध आहे.
अनुकूल "वेदना" म्हणजे "सुख" ।
प्रतिकूल "वेदना" म्हणजे "दुःख" ।
दोन्हीही "वेदनाच" आहेत...फरक फक्त "अनुकूल/प्रतिकूल" परिस्थिती मध्ये आहे...
या नश्वर जगात जगताना आपण आपल्या आयुष्यात "Man - Money - Material" या तीन "M" ला खूssप घट्ट कवटाळून बसतो...ह्यातील एखादा "M" जरी आपल्याला सोडून गेला तरी आपण अस्वस्थ होतो,व्याकुळ होतो...आपण जी गोष्ट नाही त्याचा व्यर्थ "शोक" करत बसतो...एका गोष्टीचा तडाखा बसला तर ही अवस्था होते,जर तिन्ही गोष्टींचा तडाखा बसला तर विचारायलाच नको...!!!
मॅन-मनी-मटेरिअरल या तिन्ही गोष्टी नश्वर जगातल्या नश्वर गोष्टी आहेत...आपल्या जीवनांत मॅन म्हणजे माणसं येतील-जातील, मनी म्हणजे पैसा खूप असेलही आणि कदाचित् नसेलही, आणि पैश्या मुळं उपलब्ध होणारी वस्तुनिष्ठ सुखं असतील वा नसतील, थोडक्यात मटेरियल लाईफ...ह्या तीन गोष्टीत माणूस खूप अडकत चाललाय...!!!
मानवी जीवनांत वर्तमान स्थितीत त्याच्या पाशी सर्व काही आहे पण तो प्रचंड असमाधानी आहे...असं दिसतं कारण नश्वर गोष्टीने तडाखा दिला की तो आधी दुःखी होतो आणि पुढे ती व्यक्ती-ती वस्तू-तो पैसा आता माझ्या जवळ नाही म्हणून जीवनातील अनेक क्षण-अनेक दिवस-अनेक महिने-अनेक वर्षे नव्हे वर्षानुवर्षे त्या गोष्टी बद्दल वृथा "शोक" करत बसतो...!!!
वेदान्त ज्ञान अंततोगत्वा जीवाचं परम कल्याण कसं होईल ह्याचा विचार करतं...नश्वर जगातील नश्वरता जीवाला पटवून देऊन, सुख-दुःखाच्या पलीकडील "शाश्वत आनंदाची" प्राप्ती जीवाला करून द्यायला प्रोत्साहित करतं... एखादी व्यक्ती,एखादी वस्तू वा द्रव्य-पैसा यांच्या नसण्यामुळं जीवाला होणारं दुःख दूर करणे ह्या पेक्षा सर्व सामान्य जीव त्या बाबत करत असलेला "शोक" व्यर्थ असतो म्हणून वरील वाक्यांत तसे विवरण आले आहे...!!!
"वेदान्त ज्ञानाचे खरे प्रयोजन "दुःख" दूर करणे नसून "शोक" दूर करणे आहे..."
नारायण...